Tag: Creativity

14
Jul

लहान मुलांतील कल्पनाशक्ती (Imagination) आणि सर्जनशीलता (Creativity)कशी वाढवावी ?

सर्जनशीलता म्हणजे वेगवेगळ्या कल्पना एकत्र करून काहीतरी नवीन विचार मांडणे किंवा काहीतरी वेगळी क्रिया करणे. लहान मुलांमध्ये सर्जनशीलता (Creativity) भरभरून असते. म्हणूनच त्यांना दिलेल्या चौकोनाबाहेरसुद्धा विचार करता येतो. पण बर्‍याचदा असे होते की, पालक म्हणून आपणच त्यांना चौकटीत विचार करायला भाग पाडतो. त्यामुळे आपणच त्यांची कल्पनाशक्ती (Imagination) मारून टाकत असतो. लहान मुलांसाठी कल्पनाशक्ती ही त्यांच्या मानसिक विकासासाठी अतिशय महत्त्वाची असते. त्यातूनच ते बर्‍याच मानसिक आणि भावनिक त्रासांना सामोरे जाऊ शकतात. सर्जनशील मुले ही जास्त महत्त्वाकांक्षी देखील असतात. आपले ध्येय साध्य करण्यासाठी ते या सर्जनशीलतेचा चांगला उपयोग करतात. मुलांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी काय काय करू शकता ? 1. घरातएक कोपरा असा ठेवा, जो फक्त त्यांचा आहे. तिथे वापरलेली खोकी / मोडकळीस आलेल्या वस्तू, अशा सर्व गोष्टी ठेवून द्या आणि त्यांना त्यांच्याशी काय खेळायचं ते खेळू द्या. 2.दिवसातूनथोडा वेळ हा मुलांसाठी काहीही न करण्यासाठी ठेवा. थोडा मोकळा श्वास घेता आला की मुलांना पण स्फूर्ती येते. 3.टी.व्ही. बघण्यापेक्षाजास्त वेळ पुस्तके वाचण्यात घालवा. तुम्ही जेवढे जास्त वाचाल, मुलेही तुमचं अनुकरण करून वाचायला लागतील. वेगवेगळ्या विषयांवर वाचन केल्याने अनेक नवीन कल्पना सुचतात. 4.मुलेजेव्हा खेळत असतील, तेव्हा तो वेळ फक्त त्यांचा असू द्या. शक्य असेल तर तुम्हीदेखील त्यांच्याबरोबर खेळायला बसा. तुम्ही काहीतरी नवीन बनवा म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळेल. 5.रंगीत कागद आणून द्या आणि छोट्या सजावटीच्या वस्तू त्यांना करू द्या. ते जसे होतील तसे घरात लावा. तोरणं बनवा. 6.मुलांनीकेलेल्या छोट्यातल्या छोट्या वस्तूची प्रशंसा नक्कीच करा, कारण त्यामागे त्यांचे मनापासूनचे कष्ट आहेत. छोट्या छोट्या गोष्टींची प्रशंसा झाली, तरच मोठे पराक्रम करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल. आणि तरच ते सर्जनशील होतील.
Read more