विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी वापरण्यात येणारे ७ उपाय (स्ट्रेटजिज्)

पालकांपेक्षा ( प्रौढांपेक्षा ) शालेय विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती जास्त आवश्यक असते. मोठे असल्याने रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असलेले ज्ञान आणि वेगवेगळी कौशल्ये त्यांनी स्वप्रयत्नाने आधीच प्राप्त केलेली असतात.

जरी तंत्रज्ञानासारख्या काही क्षेत्रांसाठी ज्ञानाचा आधार वेगाने बदलला जात असला तरीसुध्दा नवीन माहिती ही सर्वसाधारणपणे
विशिष्ट अशा गोष्टींशी संबंधित असते ज्यामुळे आपल्या सध्याच्या  ज्ञानाचा पाया उभारला जातो. दुसरीकडे, विषयांमध्ये आवड असो अथवा नसो विविध विषयाच्या क्षेत्रांमध्ये शालेय विद्यार्थ्यांवर नवीन माहितीसह सतत भडिमार केला
जात असतो.त्यात भर म्हणून की काय,
प्रत्येक आठवड्याला त्यांनी या विषयांवर प्रभुत्त्व मिळविणे आणि त्यात प्राविण्य मिळविण्याची अपेक्षा केली जाते.
यामुळेच शालेय जीवनात यश मिळविण्यासाठी परिणामकारक आणि प्रभावी स्मरणशक्ती असणे अति आवश्यक असते.

विद्यार्थ्यांची अधिक कार्यक्षम आणि परिणामकारक स्मरणशक्ती विकसित करण्यासाठी खालील सात उपायांमुळे मदत होते :

१. वेगवेगळ्या प्रकारच्या आराखड्यांना दिशा द्या  :

दृकश्राव्य (दृश्य आणि ऐकणे) स्वरूपांमध्ये दाखविलेला मार्ग मुलांना खूप फायदेशीर असतो. या व्यतिरिक्त, त्यांना मिळालेली माहिती त्यांच्या लक्षात आहे आणि मुलांना समजली किंवा नाही हे पडताळुन पाहायचे असेल तर त्यांना
सूचविलेल्या मार्गांचे पुन्हा पुन्हा स्मरण करण्यास आणि त्याचा अर्थ समजाविण्यास सांगितले जाऊ शकते. काय करणे आवश्यक आहे याची उदाहरणे देऊन समजावण्याने त्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी ठरते.

२.  विद्यार्थ्यांना दिलेल्या साहित्याचे अधिक अध्ययन करण्यास शिकविणे  :

नवीन मिळालेल्या माहितीचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्यांना ते शिकविण्याची आवश्यकता आहे.
मिळालेल्या साहित्याची एकदा तरी त्रुटीमुक्त पुनरावृत्ती करता येण्याएवढी प्रैक्टिस (अभ्यास) त्यांनी नेहमी केली पाहिजे.
तथापि, त्या माहितीला पक्के करण्यासाठी एकापेक्षा अधिक त्रुटिमुक्त पुनरावृत्तींची आवश्यकता आहे.

3.  विद्यार्थ्यांना दृश्य प्रतिमा (व्हिज्युअल इमेजेस्) आणि इतर बुध्दिमत्ता विकास करण्याच्या उपायांचा उपयोग करण्यास शिकविणे :

ज्या शब्दाचे काल्पनिक चित्र उभे करणे (व्हिज्युअलाइझ)सहजशक्य नाही त्या शब्दाच्या समान प्रतिशब्दाचा उपयोग करणे हा स्मरणशक्ती
वाढविण्यासाठीचा अजून एक मार्ग आहे उदाहरणार्थ, डोक्याच्या मागील भाग (occipital) किंवा भित्तीय (parietal) ह्या शब्दांचे दृश्य स्वरूपात चित्र उभे करणे कठीण जाते.

ज्यांचे दृश्य स्वरूपात चित्र उभे करणे सोपे असते अशा मिळत्याजुळत्या शब्दांमध्ये हे शब्द रूपांतरित केले जाऊ शकतात. अशा प्रकारे, विद्यार्थी अशा शब्दसंग्रहास लक्षात ठेवण्याच्या प्रयत्न करतात जे शब्द प्रत्यक्षात दृश्य प्रतिमांना लक्षात ठेवण्यासाठीचे सूचक असतात, जे नंतर त्या शब्दांची व्याख्या (डेफिनिशन) बनतात.

४.  विद्यार्थ्यांना खरेखुरे वाचक बनण्यास शिकवा :

अल्पकालीन स्मरणशक्तीची नोंद आणि /किंवा वाचत असतानासाठी लागणारी स्मरणशक्ती वाढविण्यासाठी
विद्यार्थ्यांनी एखादे प्रकरण वाचताना शब्दांना अधोरेखित, ठळक करणे किंवा पुस्तकाच्या बाजूला असलेल्या जागेत ते शब्द लिहून ठेवावे. त्यानंतर ते पुन्हा मागे जाऊन अधोरेखित, ठळक केलेले किंवा मोकळ्या जागेत काय लिहिले आहे ते वाचू शकतात. या माहितीला दीर्घकालीन स्मरणशक्तीमध्ये संघटित करण्यासाठी सुरूवातीचा आराखडा तयार करावा किंवा
त्याचे रेखीव संघटन (ग्राफिक ऑर्गनायझर) करावे.

५. गणिताच्या प्रश्नांमध्ये त्यामधील प्रत्येक पायर्या लिहून काढाव्या  :

ज्या विद्यार्थ्यांना एखादे कार्य करताना आवश्यक असलेली स्मरणशक्ती कमी असते अशांनी गणिताचे प्रश्न सोडविताना
मनामध्ये मोजणी करण्यावर विसंबून राहू नये. उदाहरणार्थ, जर त्यांना भागाकाराचे मोठे गणित सोडवायचे असेल तर त्यांनी गणित सोडविताना हातचा घेण्यासारखी पायरीसुध्दा लिहून काढणे आवश्यक असू शकते. इतर वेळेस विधाने असलेले प्रश्न सोडविताना, एखादा खराब कागद हाताजवळ ठेवावा आणि त्याचे उत्तर शोधताना एकेक पायरी लिहून काढावी. यामुळे उत्तर शोधताना एखादी जागा आणि त्यांना नक्की काय करायचे आहे हे विसरण्यापासून प्रवृत्त करण्यास मदत मिळते.

६.  शिकण्यापूर्वीची / शिकताना पूर्वीची असलेली मूळ स्मरणशक्ती :

विद्यार्थ्यांना एखाद्या कार्यासाठी तयार करण्यापूर्वी त्या कार्याविषयीच्या सूचना देणे उपयुक्त आहे. याला स्मरणशक्तीसाठी केलेले प्रथम मुख्य कार्य म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ,  जेव्हा वाचनाचे आकलन करण्याचे कार्य दिल्यावर, विद्यार्थ्यांना याची कल्पना येईल की, शब्दसंग्रहाविषयी आणि संपूर्ण विषयावर आधीच चर्चा करण्याने अपेक्षित अशी कल्पना मिळू शकेल. यामुळे ते ठळक माहितीवर लक्ष केंद्रित करू शकतील आणि प्रक्रियेमध्ये अधिक प्रभावीपणे ते सखोल जाऊ शकतील.  ह्या कार्यात वेळेआधी कार्याचे संयोजन करणार्यांचा उपयोग होऊ शकतो.

७.  झोपण्यापूर्वी संपूर्ण माहितीचे अवलोकन करा :

रात्री झोपण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहितीचे अवलोकन करण्याने उपयोग होऊ शकतो.अवलोकन केल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी
(जसे नाश्ता करणे, दात घासणे, संगीत ऐकणे) जर कोणते कार्य केले असेल तर त्यामुळे त्यांच्या स्मृतीमध्ये अवलोकन केलेली माहिती पूर्णपणे लक्षात राहण्यात अडथळा येतो.

Leave A Comment